न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरातील होलसेल व्यापारी व वितरकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे काम महाराष्ट्र वितरक सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र वितरक सेनेचे राज्य अध्यक्ष मारुती साळुखे यांनी केले.
आकुर्डी येथील शिवसेना भवनात महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी – चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व अन्य संगणकीकृत संघटनांच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र वितरक सेनेची बांधणी करावी.या माध्यमातून वितरकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, महाराष्ट वितरक सेनचे पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात, सरचिटणीस वैभव छाजेड, खजीनदार महेन्द्र सिंह शेखावत, उपजिल्हा अध्यक्ष गोविंद बालघरे, गणेश आहेर, बाळासाहेब नाखाते आदी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र वितरक सेना भोसरी विधानसभेने या मेळाव्याचे संयोजन केले.












