- पिंपरी चिंचवडमध्ये आज ८७ जण कोरोनाने बाधित; तीन जणांचा मृत्यू तर, ७१ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. २६ जानेवारी) रोजी ८७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील दोन पुरुष निगडी (७२ वर्षे), रावेत (६४ वर्षे) यांचा तर चिखलीतील ४९ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९८२५ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६३१४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७९९ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















