- पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत फडकवला तिरंगा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान व जिजाऊंच स्वराज्य संघटना सह्याद्री मधील गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रत्येक महिन्यातुन आयोजित करीत असते. प्रजासत्ताक दिनाच निमित्त साधुन शिवधर्म फाउंडेशन ने महाराष्ट्र मधील सर्वात उंच १६०० मीटर असलेल्या शिखरावर दिनांक २६ जानेवारी ला जाऊन भारतीय राष्ट्रध्वजाचे पहाटे पहिल्या सूर्याच्या किरणा सोबत ध्वजारोहण केले.
शिवधर्म फाउंडेशन ने दिनांक २५ तारखेला किल्ले रतनगडला भेट दिली आणि गडाची पाहणी सोबत गडाची स्वच्छता केली. २६ तारखेला पहिल्या सूर्याच्या किरणासोबत कळसुबाई शिखरावर शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानमार्फत भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण अगदी उत्साहात करण्यात आले.
शिवधर्म फाउंडेशनमार्फत प्रश्नमंजुषा, शिवदिनविशेष प्रत्येक दिवशी प्रसार केला जातो. महाराष्ट्र मधील गडकिल्लेबद्दल ऐतिहासिक गडाची माहिती देत संवर्धन मोहिमा तसेच सह्याद्री मधील गडकिल्ले पाहण्याची इच्छा असलेल्या गिर्यारोहकांसाठी शिवधर्म फाउंडेशन च्या ‘सह्याद्रीचे भुते’ मार्फ़त ट्रेकिंग मोहिम चे आयोजन प्रत्येक महिन्यात करण्यात येईल असा संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्रचे शिवकार्य व गडसंवर्धन समितीचे अध्यक्ष राज तपसे, जिजाऊ स्वराज्य संघटनाच्या उपाध्यक्षा पुर्वा काळे, मोहीम क्र ४ प्रमुख दिनेश ढगे, सुरज करांडे, अंकुश शिवतारे, वैभव टकले, जयश्री मुळे, माधुरी, स्वप्नील कापरे, निखिल घुले, विजय जाधव, निलेश भोम्बा, लक्ष्मण कोलते आदी सभासद मोहिमेत सहभागी होते.
महाराष्ट्रमधील गडकिल्ले आज आपण नाही संवर्धन केले तर उद्या आपणच आपली दुर्गरत्नाची नुतन श्रुष्टी गमावून बसू. म्हणून गड किल्ले संवर्धन करणे व त्याचे पावित्र्य जोपासणे आज काळाची गरज आहे. कळसुबाई शिखरावर पहिल्या सूर्यकिरणांच्या सोबत केलेला ध्वजारोहण कार्यक्रम मोठा उत्साह आणणारा होता.
– राज तपसे, अध्यक्ष शिवकार्य व गडकोट संवर्धन समिती, शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान…















