न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी (दि. २७ जानेवारी) रोजी ७९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील भोसरीमधील ३६ वर्षीय एका पुरुषाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९९०४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६३९८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८०० जणांचा मृत्यू झालेला आहे.















