- एकाला जिवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- ट्रेडिंगमध्ये गुंतवलेले पैसे ग्राहकांना परत न दिल्याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यामुळे तिघांनी एकाला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. एम्पायर इस्टेट, पिंपरी येथे रविवारी (दि. २४) दुपारी हा प्रकार घडला. अनिल चंद्रशेखर मेहता (वय ४४, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सचिन वरखेडे (वय ४२, रा. जेल रोड, नाशिक), रवींद्र जाधव (वय ३०, रा. शिंदेगाव, ता. जि. नाशिक), अश्विन मोड (वय २८, जेलरोड, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन वरखेडे याच्या कंपनीत ग्राहकांनी ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवले आहेत. ते पैसे त्याने ग्राहकांना परत दिले नाहीत, याबाबत फिर्यादी मेहता यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्याचा राग आल्याने आरोपीनी मेहता यांना मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.