- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटींची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या चिंचवड शाखेची २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या दरम्यान पावर हाऊस चौक, चिंचवडगाव येथील नगर अर्बन को. ऑप. बँकच्या शाखेत घडला.
याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मुंजदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (५६, रा. औरंगाबाद रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.