- कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी त्यांच्याकडील पाणीपुरवठा विभाग काढून कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याकडे सहशहर अभियंतापदाचा कार्यभार सोपविला आहे.
त्यामुळे शहराची पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्रवीण लडकत यांच्या खांद्यावर आली आहे. तांबे यांच्याकडे जलनि:सारण विभाग व पर्यावरण विभागाची जबाबदारी दिली आहे.
अनेक दिवसांपासून या विभागासाठी सक्षम अधिकाऱ्याचा शोध घेतला जात होता. तांबे यांच्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या असंख्य तक्रारी होत्या. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत होती.














