न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२१) :- माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्याशी घटस्फोट घेण्यापूर्वीच दुसरे लग्न केले.
याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार सन २०१० पासून २९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत सातारा आणि मोशी येथे घडला.
नितीन मोहन सोनवणे (वय ३९, रा. मोशी), जयश्री मोहन सोनवणे (वय ६५), मोहन गणपत सोनवणे (वय ७०, दोघे रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित ३६ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.














