- पालिका आयुक्तांकडून आदेश; मात्र इतर अटी बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- पिपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये खाजगी चारचाकी वाहनातून कुटंबातील व्यक्ती प्रवास करताना मुखपट्टी वापरातून (मास्क) पालिका आयुक्तांनी सूट दिली आहे. मात्र त्यासाठी अटीही ठेवल्या आहेत.
प्रवासात वाहनामध्ये चालकासह सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असणे आवश्यक राहील. कुटुंबातील व्यक्तीसोबत अन्य वाहन चालक अथवा अन्य व्यक्ती एकत्रित प्रवास करीत असतील तर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. मुखपट्टी (मास्क वापराबाबत यापूर्वी निर्गमीत केलेले आदेश उपरोक्त बाबी व्यतिरिक्त कायम राहील. यापुर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम, त्याकरीता निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु राहतील.
संदर्भिय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापुर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.


















