- ८ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस बार असोसिएशनची सन २०२०-२०२१ ची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे व अटींचे पालन करून २० फेब्रुवारीला सकाळी दहा ते साडेपाच या वेळेत निवडणूक होईल. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता मोजणी होणार असून, त्यानंतर कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक कार्यकारी समितीच्या सदस्यांनी दिली.
असोसिएशनचे १ हजार २०० सभासद आहेत. नवीन सभासदांसाठी अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे. ३० जानेवारीपर्यंत नवीन अर्ज स्वीकाराण्यात येतील. त्यानंतर ३ फेब्रुवारीला त्याची यादी प्रसिद्ध होईल. त्याची छाननी होऊन ५ फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. दरम्यान, ८ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान सकाळी अकरा ते बारा या वेळेत अर्ज वाटप व स्वीकृतीची वेळ देण्यात आली आहे. ११ ला छाननी तर, १२ फेब्रुवारीला माघार घेता येईल. त्यानंतर १५ ला अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर २० फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात येईल.
विशेष कार्यकारिणी समिती म्हणून सुभाष चिंचवडे, उत्तमराव चिखले, देवराव ढाळे, सुशील मंचरकर, विजय शिंदे, संजय दातीर-पाटील, अनिलकुमार तेजवाणी, विलास कुटे आणि सुहास पडवळ निवडणुकीचे काम पाहणार आहेत.


















