- तेरा तरुणींची सुटका; आरोपीला मुद्देमालासह अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांचा शोध घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेणा-या टोळीचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी तेरा तरुणीची सुटका केली. तर एकाला अटक केली आहे.
अर्जुन प्रेम मल्ला (वय ३६, विमाननगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे एका वेबसाईटच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय करीत. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर त्याना मुलीचे फोटो पाठवले जात. त्यातून ग्राहकाने मुलगी निवडल्यानंतर त्यांना पाहिजे असलेल्या ठिकाणी मुलीना पाठवल जात.
त्या बदल्यात सबंधित ग्राहकाकडून तब्बल आठ ते वीस हजार एवढी रक्कम घेतली जात. या सेक्स रेकेटची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसानी सोशल मीडियाचा वापर करून १३ महिलांची सुटका करत एकाला अटक केली. आरोपीकडून एक मोटार, मोबाईल फोन असा एकूण चार लाख दहा हजाराचा ऐवज जप्त केला.
















