न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २९ जानेवारी) रोजी १०३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपरीमधील एक ८० वर्षीय पुरुष तर निगडीतील ७३ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १००११७ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६४८८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८०६ जणांचा मृत्यू झालेला आहे.
















