- चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- चिंचवड स्टेशन येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाच्याबाहेर आज शनिवारी (दि. ३०) रोजी बेवारस बॅग आढळली होती. बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही बॅग उघडली असता त्यात कपडे आढळून आले.
महामार्गावर अनेक ट्रॅव्हल्स बस थांबतात. त्यातील एखाद्या प्रवाशाची ही बॅग असण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले.
















