- थकीत मालमत्ता कर भरा, अन्यथा संस्था सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर थकविल्याची नोटीस पाठविली आहे.
संथेकडे पालिकेचा १ कोटी ८३ लाख मालमत्ता कर थकीत आहे. पालिकेकडे २५ लाखापुढील ३२५ थकबाकीदार आहेत. या सर्वांनाही पालिकेने नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसांत थकबाकी भरण्यात यावी. अन्यथा मालमत्ता सील करण्यात येईल, असे नोटीसीत म्हटले आहे. यामध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या संस्थेचाही समावेश आहे.
















