- शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रात दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं का?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२१) :- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर (एक्सप्रेस-वे वरील) बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या शिवसैनिकांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणामध्ये कारवाई करण्याची मागणी केलेली असतानाच आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी हाच व्हिडीओ शेअर करत, शिवसेनेच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दादागिरी करण्याचं लायसन्स मिळालं आहे का?, असा प्रश्न विचारला आहे.
निलेश राणे यांनी व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करत या प्रकरणासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. “चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?,” असं ट्विट निलेश यांनी केलं आहे.
चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??
pic.twitter.com/UAJBbAzVTu — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 30, 2021


















