- वाहन चोरट्यांकडून पोलिसांच्या हातावर तूऱ्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- शहरातून कार आणि दोन दुचाकी अशी तीन वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. ३०) संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत प्रमोद शिवाजी गायकवाड (२३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची कार चोरट्यांनी शनिवारी (दि. ३०) चोरून नेली.
दुसऱ्या घटनेत प्रवीण प्रभाकर प्रधान (२२, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने ८ जानेवारी रोजी त्यांची दुचाकी लालटोपीनगर, मोरवाडी येथील दुकानासमोर पार्क केली होती. ती चोरट्यांनी पळविली.
तिसऱ्या घटनेत रामकिशन मुसी गुप्ता (४०, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी २८ जानेवारी रोजी सायंकाळी भाजी मंडई येथे पार्क केली होती. चोरट्यांनी तो पळवून नेली.


















