- ३१ जानेवारीपर्यंतची आधार संलग्न मुदत संपली..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- शिधापत्रिकेस आधारकार्ड जोडण्याचे काम जवळपास ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी देण्यात आलेली ३१ जानेवारीपर्यंतची मुदत संपली आहे. शहरात साडेतीन लाखांपेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेला ३१ जानेवारीपर्यंत आधार संलग्न करण्याची मुदत प्रशासनाने दिली होती.
मात्र, शंभर टक्के काम पूर्ण झालेले नाही. शनिवार सायंकाळपर्यंत जोडणीचे काम सुरू होते. आधार जोडणी करताना अनेकांना तांत्रिक अडचणी व ही प्रक्रिया अवगत नसल्याने अडचणी आल्या. त्यामुळे संबंधित शिधापत्रिकाधारक हवालदिल झाले होते.
याबाबत परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी सांगितले की, अ विभागातील ७२ टक्के तर, ज विभागातील ६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरीतील गांधीनगर, भाटनगर, मिलिंदनगर परिसरात विशेष कॅम्प घेतला होता.


















