- पालिकेकडून मिळणार आजपासून कोरोना प्रतिबंधक लस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- शहरामधील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने व क्लिनिकमधील डॉक्टर, परिचारिक व इतर वैद्यकीय मनुष्यबळास सोमवार (दि. १) पासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
वैद्यकीय व्यावसायिक संघटनांमधील सदस्य, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (एनआयएमए), पिंपरी – चिंचवड डॉक्टर असोसिएशन (पीसीडीए), दंततज्ज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोशिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन या संघटनांचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून पालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या ८ केंद्रात वॉक इन पद्धतीने सकाळी ९:३० ते दुपारी ४ या वेळेत उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.


















