- दोन रुग्णांचा मृत्यू; तर, ५० रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. ०१ फेब्रुवारी) रोजी ६९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील चिंचवडमधील ६१ वर्षीय व चिखलीतील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १००३९१ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९६६१९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८०९ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















