- पालिकेला मिळणार १५० कोटींच उत्पन्न..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत ३ महिने सर्वेक्षण केले. त्यात एकूण ३० हजार २०२ नव्या मिळकतींचा शोध लागला असून, त्यामुळे १५० कोटींचे वाढीव उत्पन्न पालिकेस मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणास एका महिन्याची मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आहे. पालिकेकडे साडेपाच लाख मिळकतींची नोंद आहे. अनेक मिळकतींची नोंद न झाल्याने पालिकेचा दरवर्षी कोट्यवधींचा मिळकतकर बुडत आहे. त्यामुळे पालिकेने ऑरिअनप्रो सोल्युशन एजन्सीमार्फत सर्वेक्षणास ५ नोव्हेंबर २०२० ला सुरुवात केली.
सर्वेक्षणाची मुदत ९० दिवस होती. सर्वेक्षणात नोंद नसलेल्या मिळकती आढळल्यास प्रत्येक बिलाच्या रकमेवर ६.६० टक्के शुल्क संबंधित एजन्सीला देण्यात येणार आहे. सर्वेक्षण २ फेब्रुवारी २०२१ ला संपत आहे. एकूण ३० हजार नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेतला आहे. नोंद नसणे, वाढीव बांधकाम करणे, वापरात बदल करणे असा निवासी व बिगरनिवासी मिळकतीचा यामध्ये समावेश आहे.