- विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारीपासून भरता येणार अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- आरटीई प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. आरटीईनुसार प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. जाहीर झालेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार पात्र शाळांना आणि नवीन शाळांना ८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करायची आहे.
प्रवेश घेणाऱ्या विद्याथ्यांना ९ ते २६ फेब्रुवारी या कालवधीत ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. पहिली सोडत ५ मार्चला होणार आहे. सोडतीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९ ते २६ मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यानंतर २७ ते ६ एप्रिल या दरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी पहिली फेरी होईल. दुसरी प्रतीक्षा यादी १२ ते १९ एप्रिल या दरम्यान होईल. तिसरी प्रतीक्षा यादी २६ एप्रिल ते ३ मे , चौथी प्रतीक्षा १० ते १५ मे या दरम्यान या होणार आहे. पात्र शाळांना आणि नवीन शाळांना आरटीईत नोंदणी करण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. परंतु ही मुदत वाढण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मुदतवाढ मिळत असते. शाळांनी नियोजीत वेळेत नोंदणी केली, तर जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया होईल; अन्यथा विलंब होण्याची शक्यता आहे.