- एम्पायर इस्टेटकडून राम मंदिर निर्माणासाठी १,१६,३०३ रुपयांचा निधी…
- शहरवासियांनी राम मंदिर निर्माण कार्यात हातभार लावावा – भाजप नगरसेवक शैलेश मोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२१) :- अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रस्टकडून निधी गोळा करण्याचं काम सुरु आहे. या भव्यदिव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडमधील एम्पायर इस्टेट सोसायटी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी एक लाख सोळा हजार तीनशे तीन रुपयांची वर्गणी गोळा केली.
भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींकडे हा समर्पण निधी नुकताच सुपूर्त करण्यात आला. यावेळी आनंदनगर वस्तीप्रमुख व शिक्षक बालाजी मोरे, चिंचवडेनगर व्यवस्था प्रमुख स्वप्नील मोहोरील, अथर्व जोशी, मल्हार खोले, संकेत करकरे, अनिरुद्ध जोशी, अनिकेत देशपांडे, आशिष कुलकर्णी, अमोघ गोसावी, जयदेव कौलगेकर, विजय पिंगळे व एम्पायर इस्टेट सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही देशवासीयांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. प्रभू श्रीराम यांनी पूर्ण देशाला ऐक्यात बांधून ठेवले आहे. राम फक्त राम नाही तर, आमच्या सर्वांसाठी एक राष्ट्र आहे. देशात राम राज्य आणायचे आहे. त्यासाठी राम मंदिर निर्माणाचं काम पूर्ण केलं जाणार आहे. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. यात सगळ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी देखील आपल्या परिस्थितीनुरूप १०, १००, १००० व २००० रुपये व त्याहून अधिकचा निधी देऊन राम मंदिर निर्माण कार्यात हातभार लावावा, असे आवाहन नगरसेवक शैलेश मोरे यांनी केले.















