- कोट्यवधी रूपये बांधकाम कामगार मंडळाकडे पडून – जयंत शिंदे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक निधीचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी केली आहे. या घटकाला तो मोठा दिलासा मिळणार आहे, असे संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
नोंदित बांधकाम कामगार अनिल बोडके यांची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये शिकत आहे. नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना वर्षाकाठी १ लाख रूपये शिक्षणासाठी मिळत आहे. मात्र अनेकांना हा शैक्षणिक निधी मिळालेला नाही.
कोट्यवधी रूपये बांधकाम कामगार मंडळाकडे पडून असताना देखील त्याचा वापर होताना दिसत नाही. अनेक मुलांना त्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. हा शैक्षणिक निधी कामगारांच्या पाल्यांना मिळाल्यास त्यांची मुले डॉक्टर, इंजिनियर आदीसह विविध क्षेत्रात नाव कमावतील, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले. या वेळी बांधकाम कामगारांच्या पाल्यांनी केलेल्या शिक्षणातील प्रगतीबद्दल जयंत शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.
















