- दीड लाख स्वे.फूट बांधकाम हटविणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चिखलीतील वडाचा मळा (सिल्व्हर जिम समोरील भाग) परिसरात पत्राशेडवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण १,५०,००० स्वे.फूट बांधकाम निष्कासन करण्याचे काम सुरु आहे.
या ठिकाणी २ पोकलेन, ७ जेसीबी, २ क्रेन, १०५ पोलिस, १० सहा.पोलिस निरीक्षक, ३ पोलिस निरीक्षक, १ सह. पोलिस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, उपयुक्त मनोज लोणकर, ३ कार्यकारी अभियंता, ५ उपअभियंता, १० कनिष्ठ अभियंता, २५ बीट निरीक्षक १०० मजूर असा फौज फाटा आहे.
यात काही नागरिकांनी स्वता:हून अतिक्रमण काढून घेतले आहे. .
















