- ‘क’ प्रभागातील सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांचा चमू आता काश्मीर दौऱ्यावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- झोपडपट्टीधारकांना वस्तू देण्याचा विषय महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिला आणि बालकल्याण समितीचे सदस्य केरळ दौऱ्यावर गेले होते. त्या घटनेला काही दिवस उलटताच आता ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतचे सर्व नगरसेवक व चार अधिकारी-कर्मचारी जम्मू काश्मीर येथे मार्चमध्ये अभ्यास दौ-यासाठी जाणार आहेत.
या दौ-यामध्ये ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत शहर स्वच्छता, कचरा विल्हेवाट, शाळांमधील स्वच्छता प्रकल्प, पर्यटनस्थळावरील स्वच्छता नियोजन आदी बाबींची पाहणी नगरसेवक करणार आहेत.
या दौ-यात महापालिकेचे १६ नगरसेवक, तीन स्वीकृत सदस्य, चार अधिकारी कर्मचारी अशा तब्बल २३ जणांचा समावेश आहे. या खर्चाच्या ठरावास ‘क’ क्षेत्रीय समितीने २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या मासिक सभेत मंजुरी दिलेली होती. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्यावेळी या विषयास मान्यता देण्यात आली.














