- सोन्याच्या दागिन्यासह रोकड लंपास; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- भाडेकरू महिला या घर मालकिणीच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या. त्यावेळी घरात कोणीच नसल्याने अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने, साडेसात हजारांची रोख रक्कम असा एकूण ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
ही घटना मंगळवारी (दि. २) रात्री सात ते साडेसात या कालावधीत चिंचवडेनगर येथे घडली. बापूराव यशवंत यादव (वय ४०, रा. चिंचवडेनगर, चिंचवडगांव) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.














