न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२१) :- कोकण-खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर आयोजित कोरोना योद्धा गौरव समारंभ व हळदी कुंकू समारंभ आनंदात पार पडला. यावेळी आरोग्य, पोलिस, शासकीय व इतर विभातील ज्यांनी कोरोनाच्या काळात जीवाची बाजी लावुन सेवा केली, त्यांना कोरोना योद्धा म्हणुन ट्रॉफी, सन्मानपञ, नारळ, शॉल देवुन गौरविण्यात आले. यावेळी महिला एकञ येवुन त्यांना व्यासपिठ मिळावे व महिलांना प्रोत्साहन देण्यांसाठी हळदी कुंकंवाचे आयोजन करण्यांत आले होते.
या कार्यक्रमास माजी नगरसेविका विजया सुतार, नगरसेविका अश्विनी जाधव, पुणे माथाडी मंडळाचे सदस्य परेश मोरे, अशोक कदम, राम सकपाळ, राम उत्तेकर, रूपेश कदम, गजानन मोरे, उद्योजक मनोहर यादव, संदिप साळुंखे, अभिजीत कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितीतांनी कोकण खेड युवाशक्तीच्या आतापर्यंत केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून खुप खुप शुभेच्छा दिल्या. तसेच युवाशक्तीच्या वतीने भविष्यांत देखील सामाजिक, शैक्षणिक,कला क्रिडा व इतर समस्यां सोडवण्यासाठी अग्रगण्य राहिल, अशी युवाशक्तीचे अध्यक्ष संजय मोरे यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोकण खेड युवाशक्तीचे सर्व पदाधिकारी, सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक अक्षय मोरे यांनी तर, आभार प्रा. संदिप कदम सर यांनी मानले.


















