पिंपरी (दि. १७. डिसें.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निवृत्ती वेतनधारक दिनानिमित (पेन्शनर्स डे) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता मेळाव्याचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांचे हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी-चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष दिपक रांगणेकर, भगवान काणपूरकर, श्रीराम पोटे, सावळाराम साईल, पद्माकर जनपंडित, श्रीराम परबत, श्रीकांत मोने, कुमुदिनी घोडके, व्यंकटेश पांडे आदी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले, सेवानिवृत्त वेतनधारक करत असलेल्या मागण्या आमच्या व शहराच्या भल्यासाठीच आहेत. तुमच्या संस्कारातून घडल्यामुळेच शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. निवृत्त वेतनधारकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे, अशी ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.












