- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५५ वे महाराष्ट्र प्रदेशचे एक दिवसीय अधिवेशन रविवारी चिंचवड येथे होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे, मोरेश्वर शेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहन होऊन अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत साडेदहा वाजता अधिवेशनाचे उःश्चाटन होणार आहे.
भाषण सत्रात राष्ट्रीय सह संघटनमंत्री जी. लक्ष्मण असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पज्ञश्री गिरीश प्रभुणे, डॉ. छगनभाई पटेल, महापौर उषा ढोरे यांची विशेष उपस्थिती असेल.
















