- ड्रेनेज लाईनच्या कामामुळे ३१ मार्चपर्यंत रस्ता बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- चिखली आकुर्डी रस्त्याने केशवनगर नाला ते सत्संग रस्त्यालगत ड्रेनेज लाईनच्या कामासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत गुरुवार (दि. ४) पासून तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत तो अंमलात राहणार आहे.
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले. चिखली चौकाकडून साने चौकाकडे जाणारी वाहतूक चिखली गाव ते पंचवटी नेस्ट हौसिंग सोसायटी केशवनगर नाल्यापर्यंत बंद करण्यात आली आहे.
त्या ऐवजी पाटीलनगर चौक ते सोनवणेवस्ती रोड मार्गे साने चौकाकडे तसेच, साने चौकाकडून चिखली गावाकडे येणारी वाहतूक ही सत्संग समोरुन सोनवणेवस्ती रस्त्याने पाटीलगर चौक मार्गावर वळविण्यात आली आहे.
















