न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२१) :- भोसरीतील आळंदी रस्ता परिसरातील रहिवाशी श्रीमती कोंडाबाई पन्नालाल चोपडा (वय ८८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. जैन धर्मातील संथारा या वृत्ताचा त्यांनी स्वीकार केला होता. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. भोसरी जैन श्रावक संघाचे श्रावक अशोक चोपडा यांच्या मातोश्री व आनंद युवक मंडळाचे सुजित चोपडा यांच्या त्या आजी होत.