न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०६ फेब्रुवारी) रोजी १०६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीमधील चिखलीतील ७१ वर्षीय व चिंचवडमधील ४७ वर्षीय पुरुषाचा तर, हद्दीबाहेरील खेडमधील ९८ वर्षीय पुरुष व उरुळी कांचनमधील ६७ वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १००८३२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९७०४४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२१ जणांचा मृत्यू झालेला आहे.