- नव्या सदस्याची गुरुवारी महासभेत निवड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदाचा भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी गुरुवारी (दि .४) राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या सदस्याची निवड गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.
समितीच्या सदस्यांची निवड १३ ऑक्टोबर २०२० ला झाली होती. केवळ ४ महिन्यांतच बारणे यांनी राजीनामा दिल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.














