- उद्योजकांची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- कंपनीसाठी माल खरेदी करून त्याचे पैसे न देता उद्योजकाने त्याच्या कंपनीचे स्थलांतर करून घेतले. तसेच खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता एकूण ६२ लाख १६ हजार ३४२ रुपयांची फसवणूक केली.
खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी येथील वासुली तसेच कुरुळी येथे २० जुलै २०१९ ते १४ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी उद्योजकाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमा भाऊसाहेब गलांडे (वय ३७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ७) फिर्याद दिली. त्यानुसार विपूल कासार वजरीनकर (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी, मूळ रा. बारामती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.