- वात्सल्य मदर, प्रिषा टेस्ट टयुब, मनोमय आयुर्वेदचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२१) :- भोसरी परिसरातील आई व मुलांच्या आरोग्य सेवेसाठी सर्वोत्कृष्ट सेवा देणारे वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल, प्रिषा टेस्ट ट्युब बेबी सेंटर आणि मनोमय आयुर्वेद व पंचकर्म सेंटर यांच्या माध्यमातून भोसरी व पिंपरी-चिंचवड परिसरातील डॉक्टर महिलांसाठी हळदीकुंकू व अल्पोपहार कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी कर्तुत्ववान डॉक्टर महिलांना पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. वैशाली भामरे (जिजामाता हॉस्पिटल) व डॉ. शैलजा भावसार (भोसरी रुग्णालय) या दोन्ही डॉक्टर महिलांनी कोव्हिडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात समाजाची सेवा केली म्हणून त्यांना कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. प्रेरणा कालेकर, डॉ. सारिका भोईर, डॉ. रत्नप्रभा चौधरी, डॉ. स्वप्ना डांगमाळी, डॉ. अलका भळगट यांना नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी भोसरी, मोशी व चिखली या परिसरातील विद्यमान नगरसेविका नम्रता लोंढे, सारिका लांडगे, अनुराधा गोफणे, अश्विनी जाधव, सुनिता गवळी, शुभांगी लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या कविता आल्हाट, रुपाली आल्हाट, सुमन जांभूळकर आदी उपस्थित होत्या. या सर्वांचाही हॉस्पिटल तर्फे सन्मान करण्यात आला व वाण म्हणून रोप देण्यात आले. यावेळी वात्सल्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. माधुरी, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. अर्चना, डाॅ. शंकर गोरे, डॉ. अर्चना, डॉ. संदीप कवडे, अनिता व दिलीप पानसरे, तसेच मनोमय आयुर्वेदचे डॉ. सुहास शिंदे व श्वेता शिंदे उपस्थित होते.
उपस्थित डॉक्टर महिलांमधून उत्कृष्ट वेशभूषा व उत्कृष्ट केशभूषा अशी बक्षिसेही देण्यात आली. सर्व महिलांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. प्रिषा टेस्ट ट्युब बेबी सेंटर व मनोमय आयुर्वेद, पंचकर्म सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व उपचारांवर १५ ते ३० टक्के पर्यंत सवलत देण्यात येईल, असे डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. श्रद्धा, डॉ जीवन चौधरी, डॉ. स्वाती व सुनील मस्के यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश शेटे यांनी केले.














