- महिन्याभरात १८ हजार जणांवर कारवाई; ८९ लाखांचा दंड वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवडमध्ये दुचाकी वापरत असाल, तर तुम्हालाही आता हेल्मेट घालावे लागणार आहे. कारण पोलिसांनी कसलाही गाजावाजा न करता हेल्मेटसक्ती लागू केली आहे. मागील महिन्याभरात एकूण १८ हजार जणांवर कारवाई करून पोलिसांनी ८९ लाखांचा दंड आकारला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात दुचाकींचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत. सन २०१९ मध्ये पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत ३१९ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये २७९ जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातील बहुतांश घटनांमध्ये हेल्मेट न घातल्याने मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशाने ही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.
जानेवारी २०१९ मध्य एक हजार ५३ जणांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई केली होती. तर यंदाच्या जानेवारी या एकाच महिन्यात तब्बल १७ हजार ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली.