- योजनेला जनजागृतीची गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- सहकार विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी १ ते ३१ जानेवारीपर्यंत सोसायट्यांचे मानीव अभिहस्तांतरण मोहीम राबविली. मात्र, या मोहिमेस नागिरकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. २२ जून २०१८ च्या शासन निर्णायानुसार मानीव अभिहस्तांतरण करण्याचा अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधकास दिला आहे.
या आदेशानुसार सहकार विभागाचे कर्मचारी स्वत: सोसायट्यांमध्ये जाऊन कन्हेन्ससाठी प्रयत्न करीत होते. परंतु शहरातील ५७१३ गृहनिर्माण संस्थांपैकी ५०५ संस्थांचे अभिहस्तांतरण पूर्ण झाले आहे.
गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या कायदेशीर हक्क विकसकाकडून मिळवून देण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, नागरिकांमध्ये यासंबंधी जागरूकता नाही. भविष्यात इमारतीच्या पुनर्विकासावेळी मानीव अभिहस्तांतरणासाठी मोठ्या अडचणींना सामोर जाव लागते म्हणून नागरिकांनी अभिहस्तांतरण करून घ्यावे. यासंबधीच्या माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपनिबंधक उज्वला माळशिकारे यांनी केले आहे.