- प्रभाग क्र. २२ पवना नदीपात्रालगतच्या ३६ पत्राशेडवर पालिकेचा ‘बुलडोझर’
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाअंतर्गत ‘ ब ‘ क्षेत्रीय कार्यालयचे कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय हरिद लवाद (NGT) यांच्या सुचनेनुसार (दि. १२) रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली.
मौजे रहाटणीमधील प्रभाग क्र. २२ काळेवाडी येथील पवना नदीपात्रालगत असणाऱ्या स्वप्ननगरी कॉलनी, इंडिअन कॉलनी, महाराष्ट कॉलनी परिसरातील व्यापारी व रहिवासी वापर असलेली ३६ पत्राशेड व वीटबांधकाम असणाऱ्या अंदाजे ४०६१९.०० चौ.फु. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली.
ही कारवाई ३ जेसीबी, १ डम्पर, १५ मजूर, २ ट्रक्टर ब्रेकर आणि पिं. चिं. पोलीस आयुक्तालय वाकड पोलीस स्टेशनचे २५ पोलीस कर्मचारी, अधिकरी व मनपाचे २५ पोलीस कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्याने केली.
ही कारवाई ‘ ब ‘ प्रभाग अंतर्गत अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, सहशहर अभियंता, क्षेत्रीय अधिकारी ब प्रभाग, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली व २ उपअभियंता, ३ कनिष्ठ अभियंता यांचेसह १५ बीट ऑफिसर, १५ मनपा कर्मचारी सहकार्याने करण्यात आली.


















