- मालपाणी सुरमास (पुरुष) व कास्प काऊंटी क्वीन्स (स्त्री) संघास प्रथम पारितोषिक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२१) :- वाकड परिसरात विनायक गायकवाड युथ फाऊंडेशन तर्फे सोसायटी सभासदांकरिता आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांची आज उत्साहात व जल्लोषात सांगता झाली व चषक वितरण समारंभ मा.महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे व मा.नगरसेवक शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, नगरसेवक, शत्रुघ्न काटे, सागर आंघोळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. जल्लोषात पार पडलेल्या या सांगता समारंभास वाकड परिसरातील सर्व सोसायटीमधील सदस्य व संघ उपस्तिथ होते.
विनायक गायकवाड युथ फाउंडेशन आयोजित वाकड प्रीमियर लीगचे हे चौथे वर्ष होते या सामन्यांसाठी पुरुष ८६ व महिला १३ असे ९९ संघ सहभागी झालेले होते. दरवर्षी सोसायटी सभासदांकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या या क्रिकेट सामन्यांची वर्षभर उत्सुकता असते व फक्त सोसायटी करिता आयोजित केल्यामुळे आय टी पार्क मधील वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पाहायला मिळते.
यावर्षीचा वाकड प्रीमियर लीग सामन्यांचे पुरुष संघातील प्रथम पारितोषिक मालपाणी सुरमास (मालपाणी सोसायटी) या संघास मिळाले. तर द्वितीय पारितोषिक वेदांता सोसायटी व त्रितिय पारितोषिक साठेनगर या संघास मिळाले तर महिला संघाचे प्रथम पारितोषिक कास्प काऊंटी क्वीन्स (कास्प काऊंटी सोसायटी) या संघास मिळाले. तर द्वितीय पारितोषिक सुकासा स्पंक (सुकासा सोसायटी) व त्रितिय पारितोषिक डायनॅस्टी डेअरड्रीमर्स (डायनॅस्टी सोसायटी) या संघास मिळाले. महापौर- माई ढोरे व मा.नगरसेवक शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते श्री.नामदेव ढाके, नगरसेवक, शत्रुघ्न काटे, सागर आंघोळकर, मा.स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड व मा.नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आला. यावेळी उपस्तिथ संघानी या वाकड प्रीमियर लीग विषय अनुभव व मनोगत व्यक्त केले.