- मुद्देमालासह सहा जणांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२१) :- भोसरी पोलिसांनी मटका – जुगार अड्ड्यावर कारवाई केली. त्यात एक लाख ४४ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक केली आहे. अंगद आनंतराव राऊत (वय ४४, रा. मारुंजी गाव, ता. मुळशी जि. पुणे), गणेश भिकु जाधव (वय ४५, रा. पांडवनगर, चक्रपाणी वसाहत भोसरी पुणे), मंगेश सखाराम अंभोरे (वय ३०, रा. चक्रपाणी वसाहत देवकर वस्ती, भोसरी पुणे), संतोष कुमार भोलानाथ जयस्वाल (वय ४२, रा. धावडेवस्ती पुणे), प्रविण मनोहर चव्हाण (रा. चाकण पुणे), दगडु पांडुरंग केदारी (रा. खराबवाडी, चाकण पुणे) अशी आरोपिंची नावे आहेत. याबाबात पोलीस हवालदार राजेंद्र भानुदास राठोड यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी गावात जय मल्हार गॅरेजच्या शेजारी मोकळ्या जागेत काहीजण मटका जुगार घेत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारुन आरोपी अंगद राऊत आणि गणेश जाधव यांना ताब्यात घेतले. संभोरे अंगद राऊत यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८२ हजार ७१५ रुपयांचा तर गणेश जाधवकडून ११ हजार, मनोहर १०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींनी केवळ मटका घेण्याचे काम करतात.
मंगेश अंभोरे अड्ड्याचा मालक आहे. पोलिसांनी चक्रपाणी वसाहत येथून मंगेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाइल फोन असा १९ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगेश हा संतोष जयस्वाल याच्या सोबत मिळून हा मटका व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी जयस्वाल याला ताब्यात घेऊन १० हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त केले. जयस्वाल त्याच्या मटक्याचे कटिंग प्रवीण चव्हाण आणि दगडू केदारी यांना देत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी प्रवीण आणि दगडू यांनाही ताब्यात घेतले. प्रवीणकडून १० हजार २५० आणि दगडू कडून १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.