- अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- फिर्यादी बाबर हे फोटोग्राफीच्या ऑनलाईन ऑर्डर घेतात. सोमवारी त्यांना पुनावळे येथे होणा-या एका विवाहाची ऑर्डर मिळाली. त्यासाठी ते पुनावळे येथे गेले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची ४५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच १४ / जे जे ५६१५) पार्क केली.
सकाळी दहा ते दुपारी चार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दुपारी चार वाजता ऑर्डर संपवून बाबर हॉटेलच्या बाहेर आले असता दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
ही घटना सोमवारी (दि. १५) भर दिवसा पुनावळे येथे घडली. किरण राजेंद्र बाबर (वय २३, रा. रहाटणी फाटा) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.