न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आद्य क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळयास उपमहापौर केशव घोळवे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्यासह ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या कमल घोलप, अनुराधा गोरखे , माजी नगरसदस्य भिमा बोबडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू चव्हाण, विठ्ठल कळसे, मोहन वाघमारे, नारायण गायकवाड, अनिल सौंदडे, प्रा. धनंजय भिसे, नितीन घोलप, तानाजी साठे, संजय ससाणे, सचिन पारवे, भगवान शिंदे, सतिश भवाळ, सुनिल भिसे आदी उपस्थित होते.


















