न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १९ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने ‘ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत’ थेरगाव परिसरातील जय भवानी चौकापासून ते सिध्दीविनायक कॉलनी पर्यंत केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदाई केलेली आहे.
शिवसेनेच्या वतीने ‘ग क्षेत्रीय’ कार्यालयाकडे खोदाई केलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा चालू आहे. परंतु, प्रशासनाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.
परिसरातील रस्ते खोदाईची दुरूस्ती येत्या पाच दिवसाच्या आत प्रशासनाकडून झाली नाही व त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास, ग क्षेत्रीय कार्यालावर नागरिकांचा मोर्चा आणून निदर्शने करण्यात येणार असल्याचे, शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.












