- स्पर्धेत तब्बल २४ संघांनी घेतला सहभाग; शिवसेना संघटक हरेश नखातेंची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- संसदरत्न व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘फुलपिच टेनिस बॉल ‘ खासदार चषक युवा क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेविका रेखा दर्शले, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, शिवसेना संघटक हरेश नखाते, तसेच संतोष सौंदणकर, युवा सेना जिल्हा समन्वयक रुपेश कदम, शिवसैनिक विजय दर्शले, शिवसैनिक गणेश आहेर, सामाजिक कार्यकर्ते महादेव भोईर, शिवसेना विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट, विभाग संघटक अंकुश कोळेकर, युवा नेते संजय मोरे, युवा नेते प्रताप सुर्वे, अमोल राठोड, नितीन दर्शले, दत्ता गिरी, गणेश भोसले, प्रदिप थोपटे, अमोल पालांडे, प्रजाक नढे, सुधीर आनपन, सोमनाथ नळकांडे, गोविंद शिंदे, सनंदन जोशी, रुपेश मोरे, प्रताप सुर्वे मित्र परिवार, अष्टविनायक कला व सांस्कृतिक मित्र मंडळ, तसेच हिंदूत्व स्पोर्ट क्लब सर्व सदस्य यांच्यासह सेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
केशवनगर येथील श्री मोरया गोसावी मैदानात रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण २४ संघांनी लाभाग घेत आहे. शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक हरेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे मुख्य आयोजन रहाटणीचे विभागप्रमुख प्रदीप दळवी व काळेवाडी उपविभागप्रमुख अनिल पालांडे यांनी केले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३१ हजार रुपये व भव्य चषक तसेच उपविजेत्या संघाला २१ हजार रुपये व भव्य चषक देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकवरील संघाला ११ हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला ७ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.