- औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलात १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान रंगणार स्पर्धा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट १९ वर्षांखालील मुली आणि मुले गटासाठी टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड कर्णधारपदी सुबोध कांबळे (मुले) आणि आमिषा पाटील (मुली) यांची निवड करण्यात आली.
पार्वती बाकळे यांची प्रशिक्षक व स्मिता गांगुर्डे, अक्षय परदेशी यांची व्यवस्थापक म्हणून निवड झाली. औरंगाबाद येथे १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे.
पिंपरी – चिंचवड मुलींच्या संघात अमिषा पाटील (कर्णधार), आना पाटील (उपकर्णधार), श्रद्धा आव्हाड, अपूर्वा काजळे, तन्वी परदेशी, नेहा आहेर, साक्षी महाजन, सिया सूर्यवंशी, सफिया शेख, श्रुतिका कोकीळ, सई खेडकर, दिव्या दारवटकर यांची निवड झाली.
मुलांच्या संघात सुबोध कांबळे (कर्णधार), साहिल गवारे, रितेश राठोड, जय धारस्कर, सोहम भगत, तनिष्क व्हनमाने, रुणाल गवारे, श्रीयश पिंगळे, प्रणव जगताप, सारंग राजूरकर, अयान शेख, सार्थक लोंढे, अब्बास रामपूरवाले यांची निवड झाली.