न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी पिंपरी चिंचवड शहरात १७२ शाळांची नोंदणी करण्यात आली. दरवर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र, नेहमीप्रमाणे शाळा नोंदणीपासूनच कोणत्या ना कोणत्या कारणाने वेळापत्रक कोलमडण्यास सुरुवात होते.
यंदाही आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार प्रवेशपात्र शाळांच्या नोंदणीला ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. त्यानंतर ९ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार होती. मात्र, शाळा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळत असल्यामुळे तीनदा मुदत वाढ देण्यात आली.
त्यानुसार वेळापत्रकात बदल झाला आहे. अद्यापि प्रवेश अर्ज भरण्याची तारीख निश्चित झाली नाही. त्यामुळे पालकांना अर्ज भरण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी १७५ शाळांची नोंदणी करण्यात आली होती.


















