न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. १९ डिसें.) :- पुणे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय प्रकल्पातून तळवडेतील राजा शिवछत्रपती विद्यालयाच्या इयत्ता नववीतील वैष्णवी प्रकाश सगर या विद्यार्थिनीच्या ‘सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन’ या प्रकल्पाची राज्यस्तरीय प्रदर्शनात निवड झाली आहे.
या विशेष प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या वतीने कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेची विद्यार्थिनी व शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
यावेळी तळवडेचे माजी नगरसेवक शांताराम भालेकर, स्वी. नगरसेवक पांडुरंग भालेकर, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश भालेकर, सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर मेमाणे, कुमार भालेकर, संतोष नखाते, युवराज भालेकर, रामदास कुटे, तुकाराम नखाते, महेश भालेकर आदी उपस्थित होते.
प्रकल्पासाठी शाळेचे आदर्श व गुणवंत शिक्षक सुहास चौधरी यांनी मार्गदशन केले.










