- आता नवीन गडी नवीन राज्य; आयुक्तांकडून शहरवासियांना अपेक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘ ब ‘ वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. आयुक्त राजेश पाटील यांनी हे फेर वाटप केले आहे. विशेष प्रकल्प, माहिती व तंत्रज्ञान, लेखा विभाग आयुक्तांनी स्वत:कडे ठेवले आहेत.
अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्याकडे प्रशासन, नगररचना, स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), शिक्षण मंडळ (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, झोनिपू (स्थापत्य) विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग, स्थापत्य प्रकल्प, आरोग्य विभाग (स्वच्छ भारत अभियानसह), मध्यवर्ती भांडार विभाग, बांधकाम परवानगी, क्रीडा अशा १४ विभागांचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार यांच्याकडे वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, विद्युत मुख्य कार्यालय (दूरसंचारसह),
आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना विभाग, बीएसयूपी, ईडब्ल्यूस प्रकल्प, बीआरटीएस प्रकल्प, निवडणूक, जनगणना (आधारसह), पशुवैद्यकीय, कर आकारणी कर संकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर (एलबीटी), अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभाग), भूमी आणि जिंदगी, पाणीपुरवठा व जल:निस्सारण आणि पाणीपुरवठा सेक्टर २३, पर्यावरण अभियांत्रिकी अशा १७ विभागांची जबाबदारी पवारांकडे सोपविण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप यांच्याकडे सर्व क्षेत्रीय ‘ग’ कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह) कायदा, सभाशाखा, आयटीआय मोरवाडी, कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण ग विभाग, सुरक्षा विभाग आणि माहिती व जनसंपर्क अशा नऊ विभागाची जबाबदारी दिली आहे.