- कुदळवाडी-चिखली परिसर सुरक्षित आणि भयमुक्त होणार – दिनेश यादव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- कुदळवाडी आणि चिखली परिसरात सीसीटीव्ही बसवून मिळणेसाठी मनपा स्विकृत सदस्य दिनेश यादव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यादव यांच्या मागणीनुसार पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने कॅमेरे बसविण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड च्या दूरसंचार विभागाने संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच कुदळवाडी आणि चिखली भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामाच्या पूर्ततेला यादव यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे.
गेल्या महिन्यात याबाबत दिनेश यादव यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना भेटून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याकरिता मागणीचे निवेदन दिले होते. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पाठपुरावा करण्यात येऊन कुदळवाडी आणि चिखली परिसर सुरक्षित आणि भयमुक्त व्हावा यादृष्टीने अजुन एक पाऊल पडल्याचे यादव यांनी यावेळी सांगितले.
या भागाला पालिकेत समाविष्ट होऊन २० वर्षे होऊन गेली आहेत पण शहराच्या अन्य भागात असलेल्या अनेक सुविधांना हा भाग वंचित आहे.त्याचा अभ्यास करून ज्या काही आवश्यक सुविधांची गरज आहे त्याची मागणी आणि पाठपुरावा दिनेश यादव यांच्या मार्फत होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावेल या दृष्टीने पावले उचलण्यात येत असल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.


















