न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २० फेब्रुवारी) रोजी २०२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील पिंपरीमधील ७० वर्षीय व भोसरीतील ७३ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०२९०० वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८१९९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३० जणांचा मृत्यू झालेला आहे.


















